जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जी.एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे सॅनट्रोनिक्स प्रा. ली. या आयटी कंपनीमार्फत रायसोनी महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून या कंपनीचे संचालक उमेश सेठिया व एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख उपस्थित होते. यावेळी ८० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली तर 75 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या.
यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. रफिक शेख म्हणाले की, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या संकल्पनेतून रोजगार, समपुदेशन व मार्गदर्शन केंद्राची महाविद्यालयात स्थापना करण्यात आली आहे.
महाविद्यालयात असलेल्या ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करणे, मुलांनी व्यवसाय करावा, यासाठी केंद्र कार्य करते. कंपनीचे संचालक उमेश सेठिया यांनी मुलाखती व निवड प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजवून सांगितली.
बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. करिष्मा चौधरी यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. तसेच ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले यांचे सहकार्य लाभले. परिसर मुलाखतीत सहभागी विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा आदींनी अभिनंदन केले़.