रामाच्या अस्तित्वावरच प्रश्न विचारणाऱ्यांना विसरू नका

 

पाटणा : वृत्तसंस्था । तुम्हाला त्या लोकांना विसरायचं नाही, ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वारच प्रश्न उपस्थित केले. राम मंदिर उभारण्याच्या मार्गात अडथळे निर्माण केले. कारण राम मंदिर उभारणीची वाट आदिवासी बांधवही अनेक पिढ्यांपासून बघत आहेत,” असं मोदी म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिराचा पुनरुच्चार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या मोदी यांनी रविवारी चार सभा घेतल्या. चारही सभांमध्ये मोदी यांनी तेजस्वी यादव व राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. चंपारण्यमध्ये मोदींची अखेरची सभा झाली. यावेळी मोदी यांनी विरोधकांना धडा शिकवण्याचं आवाहन बिहारच्या जनतेला केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम चंपारण्य येथे चौथी सभा झाली. या सभेत बोलताना मोदी म्हणाले,”स्वातंत्र्य लढ्यावेळी जो निर्धार केला गेला होता, चंपारण्यला पुन्हा एकदा तसाच निर्धार करायचा आहे. जे आत्मनिर्भर बिहार व आत्मनिर्भर भारताच्या वाटेत जे अडथळा बनत आहेत, त्यांना लोकशाही मार्गानं धडा शिकवायचा आहे,” असं आवाहन मोदी यांनी केलं.

“चंपारण्य ही भारताची आस्था व अध्यात्माची भूमी आहे. ही भूमी आपल्या सामर्थ्याला विशद करते. इथे बुद्धांच्या पाऊलखुणा आहेत. येथूनच भारताच्या स्वातंत्र्य आंदोलना नवी दिशा मिळाली होती. चंपारण्य ही बापूंच्या सत्याग्रहाची भूमी आहे. आज संपूर्ण देशाच्या सहकार्यानं अयोध्येत राम मंदिर उभं राहत आहे.

“ज्यावेळी जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवण्यात आलं, त्यावेळी काही नकारात्मक विचाराच्या लोक सांगत होते की, काश्मीरमध्ये आग लागेल. रक्ताचे पाट वाहतील. काय काय बोलून गेले. पण काय झालं. आज जम्मू काश्मीर आणि लडाख शांततेच्या मार्गानं विकासाच्या दिशेनं जात आहेत,” असं मोदी म्हणाले.

Protected Content