नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भूमिपूजन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून राममंदिर हे भारतासाठी सामर्थ्य, समृद्धी आणि सर्वांना न्याय देणाऱ्या सौहार्दपूर्ण राष्ट्राचे प्रतिक ठरेल, असे म्हटले आहे.
अयोध्येत राममंदिराची कोनशिला रचली जाण्याचा क्षण केवळ माझ्यासाठीच नव्हे तर समस्त भारतीयांसाठी एक भावूक क्षण असेल. तसेच राममंदिर आंदोलनात नियतीने माझ्याकडून महत्त्वपूर्ण भूमिका बजावून घेतली यासाठी मी ऋणी असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले. अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी, या मागणीसाठी लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्य अशी रथयात्रा काढली होती. यानंतर देशभरात राममंदिराचे आंदोलन तापले होते. दरम्यान, या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी हे ज्येष्ठ नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.