Home क्राईम रामदेववाडी येथे घरात तोडफोड करत पाच जणांना बेदम मारहाण

रामदेववाडी येथे घरात तोडफोड करत पाच जणांना बेदम मारहाण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रामदेव वाडी येथे एका घरात सामानाची तोडफोड करत लाठ्या काठ्या तसेच विळ्याने कुटुंबातील पाच जणांना बेदम मारहाण केल्याची घटना १ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे.

जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथे विशाल अजमल जाधव हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सोमवार १ मे रोजी रात्री त्यांचं कुटुंब हे घरी असताना त्यांच्याकडे गावातील सात ते आठ जण आले. कुठलेही कारण नसताना या जणांनी अजमल जाधव यांच्या दुचाकीची तसेच घरात तोडफोड करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान ८ जणांपैकी नरेश जाधव यांनी विळ्याने करुणाबाई अजमल जाधव यांच्या उजव्या हातावर मारून दुखापत केली तर विलास रामदेव जाधव, युवराज रमेश जाधव यांनी विशाल जाधव यांच्या उजव्या पायावर तसेच डोक्यावर मारहाण केली तर याचवेळी घरातील मेवाबाई पुना जाधव, पुना मंगू जाधव या दोघांनाही मारहाण करत दुखापत केली. यावेळी विशाल अजमल जाधव यांच्याबरोबर रवींद्र राजमल जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत संबंधितांनी घराच्या सामानाची तोडफोड करत मारहाण केली. याप्रकरणी जखमी विशाल अजमल जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रामदास काळू जाधव, विलास रामदास जाधव, खुशाल रामदास जाधव, नरेश रामदास जाधव, युवराज रमेश जाधव, धनराज रमेश जाधव, रमेश काळू जाधव, कमलाबाई रामदास जाधव, सर्व रा. रामदेववाडी या आठ जणांविरुद्ध दंगलीचा तसेच जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील हे करीत आहेत.


Protected Content

Play sound