राधेश्याम पाटील यांनी दिले शिरपूर महाविद्यालयात ऑनलाईन व्याख्यान

 

चोपडा, प्रतिनिधी । आर.सी.पटेल कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय शिरपूर येथे ‘स्टाफ अकॅडमी वेबिनार’ अंतर्गत ‘झूम’ ॲपद्वारे चोपडा येथील विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक राधेशाम पाटील यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ‘शिक्षण व शिक्षणाचे उपयोजन ‘या विषयावर त्यांनी प्राध्यापकांशी संवाद साधला.

आर. सी. पटेल कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर.पाटील यांनी या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केले होते. विविध विभागातील प्राध्यापक व कर्मचारी असे एकूण ७२ लोकांनी या व्याख्यानाचा ऑनलाइन लाभ घेतला . राधेश्याम पाटील यांनी व्याख्यानातून विविध शैक्षणिक विचारवंत यांच्या विचारांचे स्पष्टीकरण केले तसेच शिक्षणाचे उपयोजन आपण कसे करावे तसेच उपयोजनात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची आज गरज आहे असे त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट करून सांगितले. स्वामी विवेकानंद, विनोबा भावे, गिजुभाई बधेका अशा विविध विचारवंतांचे विचार त्यांनी स्पष्ट करून सांगितले . शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणारे असावे. तसेच व्यक्तीच्या दैनंदिन भुकेचा प्रश्न सोडवणारे असावे. कृतियुक्त अध्यापन व प्रॅक्टिकल एज्युकेशन याचेही महत्व त्यांनी विशद केले. व्याख्यानानंतर ओले. प्राध्यापकांनी राधेशाम पाटील यांना झूम ॲपद्वारे ऑनलाईन प्रश्न विचारले व त्यांनी समाधानकारक उत्तरेही दिली. प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील यांच्या या अभिनव उपक्रमाचे या लाॅकडाऊनच्या काळात सर्व स्तरातून स्वागत होत आहे .

Protected Content