यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील राणे कुटुंबाच्या माध्यमातुन यावलच्या ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कोरोना या महामारीच्या आजारापासुन संरक्षण व्हावे या दृष्टीकोणातुन आज आसैनिक अल्बम ३०या औषधीचे वाटप करण्यात आले .
या संदर्भातील माहीती अशी की, यावल तालुक्यातील हिंगोणा येथील राहणाऱ्या व सध्या भुसावळ येथे वास्तव्यास असलेल्या विभावदी दिनकर राणे यांचा दिनांक १५ एप्रील रोजी उपचारा दरम्यान सावदा येथील एका खाजगी रुग्णालयात कोरोना संयशीत रूग्ण म्हणुन मृत्यु झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला १४ दिवसाकरीता विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. नंतर, मात्र त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, राणे कुटुंबास विलगीकरण कक्षात राहुन त्यांना अनेक सामाजीक, मानसिक अडचणींना सामोरे जावे लागले. यातुन आपल्या आईच्या अशा प्रकारच्या दृदैवी मृत्यु नंतर इतरांवर हा प्रसंग ओढवला जावु नये या माणुसकी व सामाजीक दृष्टीकोणाच्या प्रेरणेतून नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या योद्धांना राणे कुटुंबाच्या वतीने यावल ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या आईच्या स्मरणार्थ विश्वनाथ दिगंबर राणे, खुशाल दिनकर राणे यांनी कोरोनाविरूद्ध रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आसैनिक अल्बम ३०ही औषधीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद पवार, सुर्यकांत पाटील, विजय वाढे, नानासाहेब घोडके व किरण जावळे यांच्यासह आदी उपस्थितीत होते.