मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मुंबई उच्च न्यायालयानंतर सत्र न्यायालयात देखील राणा दाम्पत्यास दिलासा मिळालेला नाही.
प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांच्या अटकेत असून खा. नवनीत राणा आणि आ.रवी राणा न्यायालयीन कोठडीत आहेत. राजद्रोहाच्या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर राणा दांपत्याने सत्र न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती.
राज्य सरकारने कोर्टाकडे तीन दिवसांचा अवधी मागितला असून दंडाधिकारी न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून जामीन अर्जावर कोणतीही सुनावणी झाली नसताना सत्र न्यायालयात दाद कशी मागू शकतात, असे सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी सांगितले. यावेळी सत्र न्यायालयानेही राज्य सरकारला २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देत त्यानंतर पुढील सुनावणी करण्यात येईल असे स्पष्ट केले.