राज्यात स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात

मुंबई, वृत्तसेवा | राज्य सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात केलीय. गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

 

राज्य सरकारने स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात केल्याने राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झालीय, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून ३०० वरून १५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली असेही या अधिका-याने सांगितले. त्याने पुढे सांगितले की, गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीतून सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Protected Content