मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कलम १४४ लागू झाल्यानंतरही लोकांनी त्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र करोनच्या धोकादायक उंबरठ्यावर आहे. बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती भीती लक्षात घेऊच आपण संचारबंदी लागू करत आहोत असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसेच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात आता केवळ सार्वजनिक नाही तर खासगी कार प्रवासवर सुद्धा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.