मुंबई | महाराष्ट् विकास आघाडीच्या शिवभोजन योजनेला आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरुवात करण्यात आली.
गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त १० रुपये इतक्या कमी दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ही शिवभोजन योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी १, ३५० थाळ्यांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना किंवा महिलांच्या बचत गटांना हे काम देण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या योजनेचा मुंबईत शुभारंभ केला. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटनानंतर नागरिकांना केले. सध्या राज्यात १२५ केंद्रांवर शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे.