राज्यात मान्सूनचे आगमन ; मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे (वृत्तसंस्था) आज गोवा, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. आगामी चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात हा मान्सून पोहचेल. तसेच पुढील चार दिवस म्हणजे 14 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

 

पुणे वेधशाळेचे अनुपम कश्यपी यांनी माहिती देतांना सांगितले की, मान्सूनचे आगमन झाले आहे. गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण मराठवाडा या भागातून मान्सून पुढे सरकत आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील पाच दिवसात राज्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. १२, १३, १४ जून या दिवसात चांगला पाऊस होईल, अशी माहिती देखील कश्यपी यांनी सांगितली. अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत मान्सूनयोग्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण आणि गोवा परिसरात पुढील पाच दिवस चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे.

Protected Content