राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत ; खडसेंचे भाकीत

khadse e1550572684596

नवी मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत, असे वक्तव्य केले होते. परंतू भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मात्र विरुद्ध मत मांडत आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत. महाघाडीचे सरकार मोडेल, पण राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचे म्हटले आहे. ते नवी मुंबईत भाजपचे राज्यव्यापी अधिवेशनात बोलत होते.

 

खडसे यावेळी म्हटले की, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आहे. या सरकारमध्ये काही गोष्टींवर मतभेद आहेत. हे मतभेद आता उघड होऊ लागले आहेत. त्यामुळे तिढा वाढून हे सरकार मोडेल, पण राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. तसेच पक्षातील एखाद्या व्यक्तिवर मी टीका जरूर केली असेल, पण पक्षावर कधीही टीका केली नाही. मी नाराज होतो, पण पक्षात अजूनही सक्रीय आहे, असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या अधिवेशनाला उद्या १६ फेब्रुवारी रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.

Protected Content