मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली.

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात बहुमताचे सरकार असतानादेखील राज्यात मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? असा प्रश्न त्यांनी शिंदे-फडणीस सरकारला विचारला आहे. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
राज्यात बहुमताचे सरकार आहे. तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, हा जनतेचा अपमान आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. सध्या अतिवृष्टी सुरू आहे. आमचे अनेक आमदार त्या भागात जाऊन पाहणी करत आहे. हे प्रश्न मांडण्यासाठी विधिमंडळ हे हक्काचे ठिकाण आहे. मात्र, अधिवेशन होत नसल्याने हे प्रश्न मांडायचे कुठे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.