राज्यातील सर्व राजकीय,शासकीयसह सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी : राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनावरील राज्यव्यापी बैठकीत आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोणतीही राजकीय सभा, शासकीय कार्यक्रम किंवा इतर स्वरुपाचा सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.

 

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात सार्वजनिक कार्यक्रम रोखण्याचे आदेश दिले आहेत. कोणताही राजकीय कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम न घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शाळांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तर त्यावरही लक्ष आहे. आवश्यकता पडल्यास शाळांनाही सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्रातील प्रमुख ३ विमानतळांवर कोरोनाचा मोठा प्रभाव असलेल्या चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या ७ देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर आपले विशेष लक्ष आहे. त्यांना १४ दिवसांसाठी वेगळे ठेवले जात आहे. त्यानंतरच त्यांना आपल्या देशात फिरण्याची परवानगी देण्यावर निर्णय घेतला जात आहे. तसेच राजेश टोपे म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी अनेक विभाग एकत्र येऊन काम करत आहेत.

Protected Content