मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी आता राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये २५ टक्के कर्मचारी कार्यरत राहतील अशी महत्वाची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज कोरोनाबाबतच्या अपडेटसाठी राज्यातील जनतेशी संपर्क साधला. ते म्हणाले की, राज्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ५२ झाली असली तरी यातील काही रूग्ण बरे होतांना दिसत असल्याची बाब दिलासादायक आहे. बस व ट्रेन रद्द करण्याचा उपाय हा सध्या तरी उपयोगाचा नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने काही दिवसांपूर्वी शासकीय कार्यालयांमध्ये निम्मी उपस्थिती आलटून-पालटून राहिल असे नियोजन केले होते. आजपासून मात्र २५ टक्के हजेरी राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.