राज्यातील मंत्री आणि आमदार कोरोनाच्या विळख्यात

मुंबई प्रतिनिधी | एकीकडे कोरोनाचा प्रकोप वाढत असतांना राजकीय वर्तुळातही याचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याची माहिती आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना राजकीय क्षेत्रातील व्यक्ती कोरोना संक्रमित होण्याचं प्रमाण देखील वाढत आहे.  आतापर्यंत राज्याचे १३ मंत्री आणि ७० आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

राज्यात बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, एकनाथ शिंदे, के. सी पाडवी, धीरज देशमुख, रोहित पवार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील,   प्रताप सरनाईक, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक आमदार आणि मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. लोकप्रतिनिधी हे जनतेच्या कायम संपर्कात असतात. यामुळे आता त्यांना झालेल्या कोरोनामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना देखील याचा संसर्ग झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content