जळगाव, प्रतिनिधी | त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठेतरी मशिदीचा नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात मालेगाव,अमरावती व नांदेड येथे नुकतेच दंगली झाल्या.पंधरा हजार ते ४० हजार लोकांच्या जमावाने रस्त्यावर उतरून दुकाने कार्यालय गाड्यांचा विध्वंस केला गेला याचा निषेध नोंदविण्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ठिय्या आंदोलनात जि.प. अध्यक्षा ना. रंजना पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा आ. राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, जि. प.सदस्य नंदू महाजन, भाजपा जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जि. प. सदस्य पोपट तात्या भोळे, मधुकर काटे, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, विशाल त्रिपाठी, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात त्रिपुरा येथील घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव अमरावती व नांदेड येथे अफवा पसरून व धार्मिक भावना भडकावून बदल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या मार्फत झाली पाहिजे. ही दंगल घडवणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे. दंगलीत हात असलेल्या रजा अकादमी वर बंदी घातली पाहिजे. पैशासाठी उस्फूर्तपणे वाटा उचललेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी. भारतीय जनता पार्टीच्या नेते कार्यकर्त्यांवर पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/302621565045789
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/581988149557249