मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी लॉकडाऊनची उपाययोजना करण्यात आली असतांनाही रूग्णांच्या संख्येत वाढत होत असून यातील सर्वाधीक वृध्दी ही मुंबई शहरात आढळून आली आहे.
मुंबईत करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल १०३ ने वाढली आहे. त्यामुळे एकट्या मुंबईतील करोना रुग्णांची संख्या आता ४३३ वर गेली आहे. मुंबई महापालिकेने माहितीचे पत्रक दुपारी जारी केले. त्यानुसार एकूण ७२ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. शिवाय ३१ मार्च ते २ मार्च या काळात घेतलेल्या एकूण नमुन्यांपैकी ५५ जणांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. यात आजच्यापैकी ४८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. तर आज मुंबईत एकूण २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, देशातील करोना रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळपर्यंत ३ हजार ५७७ वर पोहोचली. एकूण मृतांची संख्याही ८३ वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोविस तासांमध्ये यात ५०५ रुग्णांची भर पडली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००