राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत सागर कोळी द्वितीय

 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळसरे येथील तर,प्रताप महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी सागर कोळी याने राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत यश संपादित केले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष.मेहबुब भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे येथे राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रताप महाविद्यालय अमळनेरचा विद्यार्थी कवी सागर सुकदेव कोळी (प्रताप कॉलेज अमळनेर -MA, Political science.) याने त्याची स्वरचित अहिराणी कविता सादर केली.राज्यस्तरीय स्पर्धेत त्याचा या स्वरचित कवितेस द्वितीय क्रमांकाने विजयी झाला. बक्षीसाचे स्वरूप,रोख रक्कम प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यास सन्मानित करण्यात आले. त्याचा या यशाबद्दल खाशी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ तसेच प्राचार्य प्राध्यापक वर्ग व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content