रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यसभेवर तीनही जागांवर भाजपचा विजय होणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिली.
रावेर शहरातील ओंकारेश्वर येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यावेळी माजी मंत्री आमदार महाजन बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, भाजपाचे तिसरे उमेदवार महाडीकांना विजयी करण्यात माझी देखिल छोटीशी भूमिका असणार आहे. महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र करत भविष्यात शिवसेनेला पश्चातापाशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. त्यांना पुढे ना भगवान राम वाचवू शकेल किंवा ना हनुमानजी वाचवू शकतात. राष्ट्रवादीत घराणेशाही सुरु असल्याची टिका माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केली.
यावेळी बैठकीला खा. रक्षा खडसे, आ. राजूमामा भोळे, भाजपा भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भरत महाजन, किसानसभेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख सुरेश धनके, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, भाजपा तालका उपाध्यक्ष विशाल पाटील, माजी सभापती कविता कोळी, जुम्मा तडवी, हरलाल कोळी, संदीप सावळे, प्रल्हाद पाटील, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, वासु नरवाडे यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.