राज्यपाल अशा पद्धतीने कोणाची अडवणूक करु शकत नाहीत : छगन भुजबळ

नाशिक (वृत्तसंस्था) राज्यपाल अशा पद्धतीने कोणाची अडवणूक करु शकत नाहीत. उद्धव ठाकरे हे व्यंगचित्रकार, फोटोग्राफर, संपादक आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सगळ्या नियमात उद्धव ठाकरे बसतात. त्यामुळे कोरोनाच्या संकटात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.

 

राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे. मात्र राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे फोटोग्राफर, सामनाचे संपादक, आणि एक कलाकार असल्यानं, त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त करण्यास राज्यपालांना कोणतीही अडचण नाही. त्यांना निर्णय घ्यावाच लागेल. दरम्यान, भाजपने मंत्रिमंडळाच्या निर्णयाला आक्षेप घेत, उद्धव ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.

Protected Content