यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील राजोरा गावातील सामाजीक कार्यकर्ते व भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर कोळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन जनसेवा हॉस्पीटल व भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले होते.
भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन लोकहिताचे सामाजीक व विधायक उपक्रम म्हणुन यावल येथील डॉ कुंदन फेगडे यांच्या जनसेवा मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटलच्या सौजन्यातुन गावातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातुन मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते .राजोरा येथील एल एम पाटील विद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात १४५ नागरीकांच्या विविध आजारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली , या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात यशस्वी करण्यासाठी मधुकर नारखेडे, नागेन्द्र लोखंडे, प्रविण लोखंडे, सुर्वणा महाजन, कल्पेश पाटील, मयुर महाजन, रघुनाथ धनगर, सदाशिव कोळी, सुजित वानखेडे, सचिन पाटील, घनश्याम कोळी, सुनिल कोळी, बापु कोळी यांचे व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सागर कोळी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.