यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील राजोरा गावातील जिल्हा परिषदच्या मराठी शाळामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व माजी आमदार स्व.हरीभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
स्व.हरीभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा युवामोर्चातर्फे शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमास ए.एम.पाटील विद्यालय चेअरमन मधुकर नारखेडे , भाजपा युवामोर्चा यावल तालुकाध्यक्ष सागर कोळी ,ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील ,मयूर महाजन, कल्पेश पाटील, घनश्याम कोळी, सुभाष महाजन, गोविंदा पाटील, अशोक पाटील, अक्षय नेहेते, शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना सोनवणे यांच्यासह गावातील मान्यवर व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी मंडळी तसेच ग्रामस्थ हे मोठया संख्येत या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी भाजयुवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी व त्यांच्या सर्व सहकार्यानी कामकाज पहिले.