जयपूर (वृत्तसंस्था) मु्ख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारने राज्यातील सर्व सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
राजस्थानमध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर सरकारी शाळांमध्ये सावरकर, उपाध्याय, माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र, हे सर्व नेते भाजपाचे आदर्श असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. तसेच, हे नेते विद्यार्थ्यांसाठी आदर्श नसल्याचेही काँग्रेसचे मत आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व सरकारी शाळांमधून हे फोटो काढून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. सरकार महापुरुषांमध्ये भेदभाव करत आहे, असा आरोप केला आहे