मुंबई (वृत्तसंस्था) ‘राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत,’ असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.
आरोपींची तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागमी सर्व स्तरातून होत आहे. दरम्यान राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असे, म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, “राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.