नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोर्टाचा वापर करू नका, हेच करायचे असेल तर टीव्ही चॅनेल्सवर जा, अशा शब्दात सरन्यायाधीश बोबडे यांनी पश्चिम भाजपा आणि पश्चिम बंगाल सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये कथितरित्या होत असलेल्या राजकीय हत्यांविरोधातील भाजपाचे प्रवक्ते गौरव बन्सल यांनी याचिका केली आहे. त्यावर सोमवारी सुनवाणी झाली. भाजपाच्या वतीने ज्येष्ठ वकील गौरव भाटिया तर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारच्या बाजूने बाजू मांडत होते. या याचिकेला कपिल सिब्बल यांनी विरोध केला. एखादा राजकीय पक्ष याचिका करू शकते का, हे कोर्टाने तपासावे, असे कपिल सिब्बल यांचे मत होते. त्यावर सरन्यायाधीश बोबडे म्हणाले, आम्हाला कल्पना आहे की दोन्ही बाजूचे लोक राजकीय पोळी भाजण्यासाठी कोर्टाचा वापर करत आहेत. असे काही करण्यापेक्षा तुम्ही टीव्ही चॅनेल्सवर जा. तेथे तुम्हाला जी प्रसिद्धी मिळवायची ती मिळवा.