राजकारणात पैसे आणि जात लागते, राजसाहेब मला माफ करा ; मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या

नांदेड (वृत्तसंस्था) राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केले जाते आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत, असा मजकूर चिट्ठी लिहून मनसे शहराध्यक्षाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील इरावार असे मयताचे नाव आहे.

 

 

जिल्ह्यातील किनवटमध्ये राहणाऱ्या सुनील इरावार यांनी काल शनिवार रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या नोटमध्ये त्यांनी लिहीले, राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केले जाते आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, पप्पूदादा, मला माहिती आहे मी माफ करण्याचा लायकीचा नाही, तरी तुम्ही मला सर्वजण मला माफ करशाल अशी आशा बाळगतो. आई मला माफ कर – तुझाच सुनील, जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे, असा मजकूर चिठ्ठीत आहे.

Protected Content