जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर स्मशानभूमीजवळ माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे यांच्यावर बुधवारी ४ नोव्हेंबर रात्री चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. खूनाच्या प्रकरणातील अटकेत असलेल्या चारही संशयितांची पोलीस कोठडी संपल्याने आज न्यायालयात हजर केले असता कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.
गणेश दंगल सोनवणे रा. वाल्मिक नगर आणि विशाल संजय सपकाळे (साळुंखे) रा. राजाराम नगर, रूपेश संजय सपकाळे (वय-१९, कांचन नगर) आणि महेश राजू निंबाळकर असे अटक केलेल्या चारही संशयित आरोपींची नावे आहे.
याबाबत वृत्त असे की, बुधवारी ४ नाव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळ माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा सोनू सपकाळे याला चार ते पाच जण मारहाण करत होते. भावाला मारहाण करत असल्याचे पाहून राकेश सपकाळे (वय २८, रा. शिवाजी नगर ) भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत असतांना राकेशवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. हा खून पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलीसांनी बळावला होता. सोनू सपकाळे यांच्या फिर्यादीवरून मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यरात्री पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली घेवून घटनेचा पंचनामा केला. खूनातील चारही संशयितांना शहर पोलीसांनी गुरूवारी रात्री उशीरापर्यंत अटक केली होती. न्यायालयाने चौघांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज चौघांची पोलीस कोठडी संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले असता १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा करीत आहे.