राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल !- मुनगंटीवार

मुंबई प्रतिनिधी  । ”प्रत्येक शिवसैनिकाची नार्को टेस्ट केली तर यातून कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी नको असेच ऐकू येईल, तसेच संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल” अशा शब्दात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

 

शिवसेनेचे नेते अनंत गिते यांनी राष्ट्रवादीवर शेलक्या भाषेत टीका केल्याने राजकीय वातावरण तापले असतांनाच आता माजी मंत्री सुधील मुनगंटीवार यांनी या वादात उडी घेतली आहे. टिव्ही नाईन या वाहिनीशी बोलतांना त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा. त्यातून एकच आवाज बाहेर येईल कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे हे पोलिटिकल सुसाईड आहे, ही युती नकोच, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

 

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, आज एक संजय राऊतांचा अपवाद जर सोडला तर राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल. राऊत हे उद्धव ठाकरेंचं जेवढं कौतुक करत नाहीत त्यापेक्षा ते जास्त शरद पवारांचं कौतुक करत असतात.अनंत गीते हे हृदयपासून बोलत होते. जे बोलत होते ते ऐतिहासिक सत्य आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर अशी दुर्देवी, अनैसर्गिक आघाडी झाली हे बघून बाळासाहेबांनी शिवसेना विसर्जित केली असती. अशा शिवसेनेसाठी मी आयुष्याचा कण आणि कण वेचला नाही असं त्यांनी सांगितलं असतं. माझी शिवसेना देव, देश आणि धर्मासाठी काम करत आली असल्याची आठवणही मुनगंटीवार यांनी करून दिली.

Protected Content