राऊतांच्या जामीनाला स्थगिती नाहीच ! : आजच येणार बाहेर

 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला असल्याने ते आजच कारागृहाच्या बाहेर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला. पत्रा चाळ घोटाळ्यातील संशयित म्हणून त्यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने अटक केली होती. १०० दिवसांपासून ते कारागृहात होते. न्यायालयाने त्यांच्या जामीनावर निकाल राखून ठेवला होता. आज मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ईडीने न्यायालयाच्या या निकालाला स्थगिती मिळावी अशी मागणी उच्च न्यायालयात केली आहे. यावर आजच सुनावणी झाली. यात उच्च न्यायालयाने जामीनाला स्थगिती देण्यास नकार दिला. यानंतर ऑर्थर रोड कारागृहात रिलीज ऑर्डर पाठविण्यात आली असून सुमारे सात वाजेच्या सुमारास संजय राऊत हे कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता असल्याची माहिती वकील नितीन भोईर यांनी दिली.

Protected Content