Home क्राईम रस्त्यावरून जात असताना विवाहितेचा विनयभंग

रस्त्यावरून जात असताना विवाहितेचा विनयभंग


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । मुलाला शाळेत घेवून जाणार्‍या विवाहितेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना शनिवारी १८ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी कादर खान फकीरा खान याच्याविरुद्ध शहर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शनिवारी १८ मार्च सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असतांना कादर खान याने विवाहितेचा रस्ता अडविला. त्यानंतर त्याने विवाहितेचा हात पकडून माझ्याकडे खूप पैसे असून माझ्यासोबत चल असे म्हणून त्याने महिलेचा विनयभंग केला. अचानक झालेल्या प्रकारामुळे विवाहिता प्रचंड घाबरुन गेल्या त्यांनी लागलीच घराकडे धाव घेतली. तसेच यापुर्वी देखील कादर खान हा विवाहितेच्या घरी त्यांच्या भावाचा मोबाईल क्रमांक घेण्याच्या बहाण्याने येत होता. परंतु त्याला विवाहितेने त्यांच्या घरी येण्या मज्जाव केला होता परंतु तो ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता. अखेर आज त्याने विवाहितेचा रस्ता अडवून तीच्यासोबत अश्लिल वर्तन करुन विनयभंग केला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन कादर खान फकीरा खान याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोेहेकॉ ओमप्रकाश सोनी हे करीत आहे.


Protected Content

Play sound