Home Cities जळगाव रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा अन्यथा नागरिकांचा विमा काढा : शिवसेना बळीराम पेठ...

रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा अन्यथा नागरिकांचा विमा काढा : शिवसेना बळीराम पेठ शाखेची मागणी

0
22

जळगाव, प्रतिनिधी । रस्त्यावरील खड्ड्यात झालेल्या चिखलात उभे राहुन शहरातील रस्त्यामधील खड्डे बुजवून त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेना बळीराम पेठ शाखेतर्फ करण्यात आली.

महापालिकेने त्वरित बळीराम पेठेतील रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा बळीरामपेठ येथील प्रत्येक नागरिकाचां विमा काढून देण्यात यावा अशी मागणी बळीराम पेठ शिवसेना शाखेतर्फे करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख विपीन पवार, उपविभागप्रमुख जितेंद्र गवळी, माजी शाखाप्रमुख ललित भोळे व शाखा प्रमुख निर्भय पाटील, रुपेश पाटील, राज चंदनकर, नंरेद्र देशमुख, किरण चौधरी आदी शिवसैनिक उपस्थिति होते.


Protected Content

Play sound