मुक्ताईनगर : प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे रस्त्याच्या वादातून राडा झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
मुक्ताईनगर येथील खदानबर्डी भागातील रामदास सापधरे खाजगी प्लॉटवर अतिक्रमण करून रहिवाशांचा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करत आहे आजसुद्धा या व्यक्तीने लोखंडी पोल गाडून कंपाऊंड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या भागातील रहिवाशांनी विचारले असता त्यांनी महिलांना शिवीगाळ व धमकी दिली त्यावरुन मुक्ताईनगर पोलिसात फिर्यादी सौ ज्योती पवार यांच्या फिर्यादीवरून कलम 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
2018 मध्ये या भागातील रहिवाशांनी तहसील कार्यालयात उपोषण केले होते तेव्हा तत्कालीन तहसीलदार यांनी भुमिअभिलेख ऑफिसला आदेश देऊन मोजणी करण्याचे सांगितले होते तेव्हा भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी मोजणी करून त्यांनी अतिक्रमण केले आहे असा अभिप्राय दिला होता तत्कालीन तहसीलदार यांनी पोलिसांना सोबत घेऊन अतिक्रमण काढून दिले होते तरीसुद्धा सदर व्यक्ती पोल गाडून रस्ता बंद करण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहे असे सांगण्यात आले .
या आरोपीचे म्हणणे आहे की मी पुन्हा मोजणी करून शीट बनवले आहे त्यामुळे मी बांधत आहे तेव्हा आज वाद उत्पन्न झाल्यावर दोन्ही गटांना तहसीलदार दालनात बोलवून बाजू ऐकून घेतली असता रामदास सापधरे हे समाधानकारक कागदपत्रे दाखवू शकले नाहीत त्यांच्याजवळच्या मोजणी शीटमध्ये सुद्धा अतिक्रमण दिसत आहे
मागील महिन्यात या भागातील रहिवाशांना नगरपंचायतीने नोटीस काढून खाजगी वहिवाटी बाबत निवाडा देणे रस्ता काढून देणे नगरपंचायत कार्यालयाच्या अखत्यारीत येत नसल्याने महसूल विभागाकडे मागणी करण्यात यावी अशी नोटीस दिली होती आज तहसीलदारांना विचारणा केली असता गावातील रस्त्याचा नाय निवाडा देणे नगरपंचायतचे काम असते असे त्यांनी सांगितले तेव्हा या दोन्ही कार्यालयांनी एकमेकांशी समन्वय साधून एकदा काय तो न्याय द्यावा अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे अन्यथा वाद वाढू शकतो याकडे प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे. असे फिर्यादीचे म्हणणे आहे