जळगाव प्रतिनिधी दि. 20 – प्रभागातील नगरसेवकांनी एकजूट ठेऊन शहरवासीयांचे पायाभूत व मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करावे. त्या त्या भागातील जनसुविधा पुरविण्यासाठी निधी उपलबध करून सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटीबद्ध आहे. रस्ते बांधणीतून शहराचा विकास होण्यास मदत होते असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळगाव मनपा हद्दीतील प्रभाग क्र. 14 व 19 मधिल रस्ते लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
4 कोटी 10 लक्ष या कामांचे झाले लोकार्पण !
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 19 मधील हायवे ते गाडगे बाबा रिक्षास्टॉप पर्यंतचे रस्त्याचे डांबरीकरण (1कोटी) , दासूआप्पा चौक ते ईदगाह चौक पर्यंतचे डांबरीकरण (50 लक्ष), भापसेआप्पा चौक ते धानवड रस्त्यापर्यंत डांबरीकरण (50 लक्ष), साईप्रसाद कॉलनी, एम.डी.एम.कॉलनी, राम सागर कॉलनी, सदाशिव नगर येथील रस्त्यांचे डांबरीकरण (2 कोटी 10 लक्ष ) या कामांचे लोकार्पण करण्यात आले.
6 कोटी 38 लक्ष या कामांचे झाले भूमिपूजन
तसेच प्रभाग क्रमांक 14 व 19 मधील सर्वे नंबर 251 मधील आरसीसी गटार बांधकाम (40 लक्ष), अशोक किराणा ते नागसेननगर पर्यंतचा रस्ता कॉंकटीकरण (1 कोटी 51 लक्ष), सर्वे नंबर 267 व 269 मधील परिसरात आरसीसी गटार बांधकाम (61 लक्ष), सर्वे नंबर 274 ब मध्ये रस्ते डांबरीकरण (30 लक्ष), सर्वे नंबर 273 व 74 274 मध्ये आरसीसी गटार बांधकाम (1कोटी) , स्वामी समर्थ चौक ते पाटचारी पर्यंत रस्ता कॉंकटीकरण (1 कोटी 86 लक्ष), पोलीस कॉलनी मधील रस्त्यांचे डांबरीकरण (70 लक्ष) असे एकूण प्रभाग क्रमांक 14 व 19 मधील सुमारे 12 ते 15 कोटींच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले. यावेळी ठिक -ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे महिलांनी औक्षण केले. ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत चौका – चौकात भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यांची होती उपस्थिती
भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी नगरसेवक गणेश सोनवणे, आशुतोष पाटील, चंद्रकांत भापसे, कुंदन काळे, मनोज चौधरी, नगरसेविका रेखाताई पाटील, प्रतिभाताई देशमुख, गजानन देशमुख, अजय देशमुख, शोभाताई चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्याम कोगटा, महिला संपर्कप्रमुख सरलाताई कोल्हे – माळी, सोहम विसपुते, निलेश नारखेडे, शेखर कोल्हे, मनोज राठोड, आशुतोष पाटील,जगदीश राठोड, संजय पगारे, चेतन ठाकरे, स्वप्निल सोनवणे ,गणेश गांगुर्डे, मोहन यादव यांच्यासह परिसरातील महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पगारे यांनी केले. प्रास्ताविकात आशुतोष पाटील यांनी प्रभाग क्र. 14 व 19 मधिल मंजूर कामांची माहिती दिली. आभार नगरसेवक गणेश सोनवणे यांनी मानले.