जळगाव प्रतिनिधी । रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आज शहरातील चित्रा चौक ते बेंडाळे चौक दरम्यान शहर वाहतूक शाखेच्या पथकोन बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. यात १०० हून अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कैलाससिंग पाटील यांनी दिली.
उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यामानाने जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार २९ जानेवारी रोजी शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील चित्रा चौक ते बेंडाळे चौकात वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आले. यात बेशिस्त वाहन चालविणे, तोंडाला मास्क न लावणे, ट्रिपल शिट, नो पार्किगच्या ठिकाणी वाहन लावणे, चारचाकी वाहनात सिट बेल्ट न लावणे, लायसन्स नसणे अशांना दंडात्मक कारवाई केली आहे. आज दिवसभरात १०० हून अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात सुमारे ४५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर ही कारवाई पुढे सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कैलाससिंग पाटील यांनी दिली.
यांनी केली कारवाई
सपोनि कैलाससिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पाटील, जितेंद्र पाटील, रविंद्र भावसार, राजेंद्र उगले, संजय महाले, रविंद्र मोरे यांनी कारवाई केली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/159290109133315