चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाटणा येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीच्या रस्त्यात घडलेल्या भिषण अपघातात दुदैवी मृत्यू झाल्याची थरारक घटना आज सकाळी घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , तालुक्यातील पाटणा येथील विनोद भास्कर गुंजाळ (वय-४५) यांचे अपघात घडल्याची थरारक घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. या घटनेत त्यांची प्राणज्योत मालवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तत्पूर्वी वैद्यकीय अधिकारी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भगवान माळी हे करीत आहे.