रविवारी संविधानवादी जनसंघटनांच्या बैठकीचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी | संविधानवादी जनसंघटनांची विविध विषयांवर अजिंठा विश्रामगृह  येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस संविधानवादी नागरिकांनी , पुरोगामी विचारांचा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

रविवार दि. ३१ आक्टोबर रोजी अजिंठा विश्रामगृह येथे सकाळी ११ वाजता संविधानवादी जनसंघटनांची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत बळीराजा गौरव दीन साजरा करणे व दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान रॅली व संविधान मोहोत्सव साजरा करणे व इतर विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तरी या बैठकीस संविधानवादी नागरिकांनी , पुरोगामी विचारांचा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष व संविधान जागर समितीचे संयोजक मुकुंद सपकाळे , भारत ससाने, दिलीप सपकाळे , रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे , हरीशचंद्र सोनवणे , समाधान सोनवणे, भारत सोनवणे , संजय सपकाळे, राजू मोरे ,नाना मगरे, गौतम सोनवणे , जयपाल धुरंधर, किरण सोनवणे, वाल्मिक सपकाळे, दिलीप त्र्यंबक सपकाळे आदींनी केले आहे.

Protected Content