रविंद्र पाटील यांच्या निधीतून सिमेंट बाकचे वाटप

 

यावल  :  प्रतिनिधी ।  तालुक्यातील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदच्या जनसुविधा योजनेअंतर्गत साकळी-दहीगाव गटाचे सदस्य तथा शिक्षण, क्रिडा व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांच्या प्रयत्नातून  सिमेंटच्या बाकांचे वाटप करण्यात आले

 

साकळीसह चुंचाळे , महेलखेडी , बोरावल , कोरपावली  व  किनगाव येथे सिमेंटचे बाक देण्यात आले या सर्व गावातील विविध  धार्मिक स्थळे व स्मशानभूमी याठिकाणीदेखील बाक देण्यात आले आहे. साकळी येथे स्मशानभूमीसह   पिर बाबा सज्जनशाहवली यांच्या दर्गासह धार्मिकस्थळांच्या ठिकाणी  हे पन्नास सिमेंट  बाक देण्यात आले .

 

लवकरच उर्वरीत ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार पन्नास सिमेंट बाक देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले .यावेळी जिल्हा परिषदचे शिक्षण, क्रिडा व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, ग्राम पंचायत सदस्य शरद बिऱ्हाडे, साहेबराव बडगुजर, माजी ग्राम पंचायत सदस्य दीपक पाटील, नूतनराज बडगुजर, भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष योगेश  खेवलकर , गजानन महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, नितीन सोनवणे , चिंतामण सुरवाडे, नाना भालेराव यांच्यासह ग्रामंस्थ उपस्थित होते.   बाक मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात  आहे

 

Protected Content