जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तसेच अखिल भारतीय शिंपी समाजाचे माजी युवक अध्यक्ष मनोज भांडारकर यांचे वडील श्री. रमेशशेठ गॊविंदशेठ भांडारकर यांचे वयांच्या 68 व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने रात्री 12 वाजता दुःखद निधन झाले.
रमेशशेठ भांडारकर हे “न्यू रमेश टेलर्स “चे संचालक व जळगाव शहर हितवर्धक संस्थेचे माजी जेष्ठ सदस्य होते. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नात, नातू असा परिवार आहे