Home Cities भुसावळ रक्षा खडसे यांना परीट समाज बांधवांचा जाहीर पाठिंबा

रक्षा खडसे यांना परीट समाज बांधवांचा जाहीर पाठिंबा


parit samaj

भुसावळ प्रतिनिधी । भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांच्या प्रचार सभेत परीट समाज बांधवांचा जाहीर पाठिंबा दिला. भुसावळ शहरातील संतोषी माता हाँल येथे १६ रोजी केंद्रीय अवजड व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जाहीर पाठींबा दिला आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष कैलास खंडु शेलोडे व श्री संत गाडगे महाराज परीट धोबी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षा खडसे यांना धोबी समाज बांधवांचा जाहीर पाठिंबा देत असल्याचे लेखी निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले. यावेळी उपस्थित समाज बांधवांनी श्री गाडगेबाबा महारांजाचा जयघोषाने परीसर दणाणून सोडला होता. निवेदनावर परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष कैलास शोलोडे, संस्था संस्थापक अध्यक्ष रमेश ठाकरे, जिल्हा सचिव गोपाळ बाविस्कर, महेश बाविस्कर, लक्ष्मण शेलोडे, नरेंद्र वाघ, किसन बाविस्कर, तुळशीराम येवलेकर, माधव बोरसे, अनिता सोनवणे, प्रवीण सोनवणे स्वाक्षऱ्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound