जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीने भाजपा कार्यालयात रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे , महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे , भाजपा महानगर सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी, महेश जोशी , नितीन इंगळे, प्रदेश सहसंयोजक गितांजली ठाकरे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विशाल जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाने जिल्ह्यात सांस्कृतिक सेल चळवळ रुजावी, वाढावी ह्या उद्देशाने पक्षात आता सांस्कृतिक सेलच्या माध्यमातून नियुक्त्या करण्यात आल्या व सांस्कृतिक सेलच्या उपक्रमात नटराज पूजन करून रंगभूमी दिन साजरा करण्यात आला.
रंगकर्मींचा सत्कार
आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रंगकर्मींचा सत्कार करण्यात आला. रंगकर्मी, युवा रंगकर्मींनी सांस्कृतिक सेल सोबत यावे व ह्या व्यासपीठाचा चित्र, नाट्य व नृत्यासाठी उपयोग करावा असे मनोगत दीपक सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. आमदार राजूमामा भोळे यांनी जळगावातील तमाम रंगकर्मींना आवाहन केले की, आमच्या सेलच्या मार्फत जर काही मदत लागली तर ती निःसंकोच सांगावी. आम्ही ती नक्की करू व ह्या आमच्या सांस्कृतिक सेलच्या माध्यमाने अनेक कलाकारांचे प्रश्न आम्ही नक्की सोडवू असे मनोगत व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विशाल जाधव यांनी सांस्कृतिक क्षेत्रातल्या अनेक संधींबाबत ओळख करून त्याचा फायदा कसा होईल हे स्पष्ट केले. प्रदेश सहसंयोजक गितांजली ठाकरे यांनी महिला कलाकारांच्या अडचणींवर भाष्य केले. सूत्रसंचलन महानगर संयोजक भावेश पाटील तर सहसंयोजक योगेश लांबोळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी आकाश भारंबे, अंकुश काकडे, दीपक भुसारी, मयूर भंगाळे ,शुभम सपकाळे, मोक्षदा लोखंडे, श्रेया जोशी, विपुल टेकावडे यांनी परिश्रम घेतले.