नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोना विरूध्दची लढाई ही मानव केंद्रीत असल्याचे नमूद करत जगाने ज्या पध्दतीत योगाला स्वीकारले अगदी त्याच प्रकारे आयुर्वेदालाही स्वीकारावे लागणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते आज मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत होते.
पंतप्रधानांनी आज मन की बात मधून संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोनाविरोधातील लढाई ही खर्या अर्थाने जनता केंद्री आहे. भारतात कोरोनाविरोधातील लढाई जनता लढत आहेत. प्रत्येकजण या लढाईचे आपल्यापरीने नेतृत्व करत आहे. तुम्ही लढत आहात. जनातेसोबत शासन आणि प्रशासन लढत आहे. देशातील प्रत्येक नागरिक कोरोनाविरोधातील या लढाईचा शिपाई आहे. तसेच या लढाईचे नेतृत्व करत आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपण अनेकदा आपल्या शक्तींना मानण्यास नकार देतो आणि जेव्हा देश याबाबत संशोधन करण्याची गोष्ट करतो तेव्हा आपण त्याला मानतो. याच कारणानं वर्षानुवर्ष गुलामीत जगावं लागलं. भारताच्या तरुण पीढीला या आव्हानाला स्वीकार करावं लागेल. जसं जगानं योग स्वीकारला तसंच आयुर्वेदही जगाला स्वीकारावा लागेल.