वरणगाव (प्रतिनिधी) केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेचा निकाल मंगळवार रोजी जाहीर झाला. या परीक्षेत तपत कठोरा येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील कांतीलाल सुभाष पाटील हे उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याने गावासह परिसराचे नाव उंचावले आहे. त्यानिमित्ताने तपतकठोरा येथे जाऊन वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे कांतीलाल पाटील यांचा सत्कार केला.
मुळचे तपत कठोरा येथील रहीवासी सुभाष बळीराम पाटील यांचे सुपुत्र खांदेशरत्न सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचे सदस्य कांतीलाल सुभाष पाटील यांनी केंन्द्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा निकाल मंगळवार रोजी घोषित झाला. या परीक्षेत कांतीलाल पाटील हे उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारीपदीनियुक्ती झाल्याने तपत कठोरा गावासह वरणगाव परीसर व संपुर्ण जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांनी घेतलेली मेहनत व परिस्थितीवर केलेली मात खरोखर प्रेरणादायी आहे. या यशाबद्दल वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सायंकाळी तपतकठोरा येथे जाऊन कांतीलाल पाटील यांचा त्यांच्या परीवाराचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
प्रसंगी राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक विष्णु खोले, रविंद्र सोनवणे,गणेश सुपडु चौधरी, समाधान चौधरी, साजिदभाई कुरेशी, राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष दिपक मराठे, शहरअध्यक्ष संतोष माळी, अल्पसंख्याक जिल्हा संघटक पप्पुभाई जकातदार, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष गजानन वंजारी, तालुका सरचिटणीस राजेश चौधरी, एहसानभाई अहमद, आकाश झोपे, सोहेल कुरेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.