युवा परिषदेच्या तालुका पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप

एरंडोल , प्रतिनिधी  । राष्ट्रीय युवा परिषदेतार्फे गुणवंतांचा सन्मान करून  गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा साहित्य वाटप व परिषदेची  एरंडोल तालुका नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. 

 

एरंडोल तालुका युवा परिषदेच्या वतीने शहरातील १० वीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.  स्कॉलार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य देखील भेट दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर होते. त्यांनी भाषणातून युवा परिषदेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ. हर्षल माने, भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले, जिल्हा सचिव आकाश धनगर,  कोमल पाटील, जिल्हा समन्वयक सागर महाजन, स्कॉलर इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य गोरख महाजन, जळगाव तालुका सचिव विलास पाटील, पारोळा तालुका उपाध्यक्ष अक्षय निकम, तालुका सचिव भारत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त तालुकाध्यक्ष मिलिंद सूर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष राकेश राजपूत, पियूष चौधरी, तालुका महासचिव तुषार माळी, तालुका सचिव चेतन पाटील, हितेश महाजन,आनंद महाजन,हितेश जोशी,तालुका कोषाध्यक्ष तेजस साळी,तालुका समन्वयक राहुल पाटील,प्रथमेश धमने,करण पवार,असलम खान, भूषण चौधरी,कांचन वानखेडे, अनिल वानखेडे या पदाधिकाऱ्यांना मास्क, माहितीपत्रक, नियुक्तीपत्र व गुलाबपष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. हर्षल माने, भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले, जिल्हा सचिव आकाश धनगर, कोमल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा समन्वयक सागर महाजन यांनी केले व सूत्रसंचालन पियूष चौधरी यांनी तर आभार तूषार माळी यांनी मानले.

Protected Content