जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त १५ नोव्हेंबर रेाजी पांडे चौकात युवासेनेतर्फे नवीन मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, नगरसेवक सचिन पाटील, विधानसभा युवा अधिकारी अमित जगताप, युवासेना जिल्हायुवाधिकारी पियुष गांधी, निलेश चौधरी, युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा प्रमुख प्रितम शिंदे, उपजिल्हायुवाधिकारी विशाल वाणी, महानगर युवाधिकारी अमोल मोरे, यश सपकाळे, महानगर समन्वयक महेश ठाकूर, अंकित कासार, प्रशांत सुरळकर, अल्पसंख्यांक आघाडीचे जाकिर पठाण, गणेश गायकवाड, अंकूश कोळी, उमाकांत जाधव, यश लोढा, प्रशांत वाणी, रोहित भामरे, गजेंद्र चौधरी, संदिप सूर्यवंशी, नितीन चौधरी, मनोहर चव्हाण यांच्यासह अनेक शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते. सदर नवीन मतदार नाव नोंदणी शिबीर २४ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार असून शहरातील नवीन मतदारांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन युवासेने तर्फे करण्यात आले आहे.