युवासेना जळगाव महानगरतर्फे शिक्षण साहित्य व अन्न वाटप

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस युवासेना जळगाव महानगर यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

 

मंत्री तथा युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना जळगाव महानगरच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील जिल्हा बाल सुधार गृहात शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सुरुची भोजनाचे आयोजन करण्यात आले. याचा १२० गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, महिला आघाडी महानगर अध्यक्षा शोभा चौधरी, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना जिल्हा शिवराज पाटील, सरिता माळी-कोल्हे, उपजिल्हा युवा धिकारी पियुष गांधी, महानगर युवा अधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, विद्यापीठ युवा अधिकारी अंकित कासार, उप महानगर युवा अधिकारी अमोल मोरे, यश सपकाळे, हितेश ठाकरे, गिरीश सपकाळे, विभाग युवा अधिकारी अमोल मोरे, चेतन कापसे, शिवसैनिक महेश ठाकूर आदी उपस्थित होते.

Protected Content