जळगाव, प्रतिनिधी । युवानेत्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसाचा निमित्ताने नाथ फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा बँकच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात ३४ कार्यकत्यानी रक्तदान केले. या शिबिरास रेड प्लस ब्लड बँक याचे सहकार्य लाभले. नाथ फाउंडेशनच्या वतीने १०० साड्या गोरगरीब महिलांना तट्याभिल सोसायटी एमएसईबी आँफीसजवळ या ठिकाणी वाटप करण्यात आले.
नाथ फाऊंडेशनच्या वतीने फुटपाथवरील गोरगरीब ६० नागरिकांना ईच्छादेवी मंदीरा जवळ मोफत कबळ वाटप करण्यात आले. नाथ फाऊंडेशनच्या वतीने श्रीराम माघ्यमिक विघालय मेहरुण येथे मुला, मुलींना ५०० माक्स , सँनिटायझर, ३० निंबाचे वृक्षरोपण करण्यात आले.
याश्वितेसाठी नाथ फाऊंडेशनचे अघ्यक्ष अशोक लाडवंजारी सुनिलभैय्या माळी, रविंद्रभाऊ पाटील , रेड प्लस ब्लड बँकेचे डॉ. सुरज पाटील, डॉ.अखत्तर अली सय्यद, डॉ. पंकज गायकवाड, डॉ. प्रमोद पाटील, चेतन धनगर, भगवानभाऊ सोनवणे , गोटू चौधरी, चंद्रकांत कोळी, योगेश देसले, विजय नारखेडे, प्रदिप (बंडू) भोळे , सरिता माळी , भारती रंधे , पंकजभाऊ नाले , ललित शर्मा, युसूफ पिंजारी, शुभमभाऊ सपकाळे, मुन्नाभाऊ पहेलवान, रितेश लाडवंजारी, अतुल खाकरे, योगेश लाडवंजारी, विशाल देशमुख , विनोद सानप यांनी कामकाज पहिले.
रक्तदाते पुढीलप्रमाणे – विशाल देशमुख, विनोद धमाले, चंद्रकांत कोळी, भल्लाभाई तडवी , कुणाल कुमावत , कोमल तळेले, अक्षय खैरणार, ईश्वर पाटील, कमलेश माळी, सुरज ओतरी, विजय बोदडे, विजय मराठे, योगेश जाधव, रफिक पटेल, ललित धनराडे, कृष्णा ठाकूर, रफीक पटेल, आकाश कुंभार, योशोदिन पाटील, जयेश तायडे, योगेश सोनवणे, शरीफ शेख, आदींनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविला.