युट्यूबवर रोजच्या जीवनातील मराठी शब्दाबद्दल खास मालिका

यावल,   प्रतिनिधी   बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा बदल  होत असतांना त्याला पर्याय म्हणून किडस् कौशल्यच्या मार्फत विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनात वापरे जाणारे अनेक शब्दांची माहिती  युट्यूबद्वारे एक खास मालिकेद्वारे  जळगावच्या तेजस्वीनी चौधरी ह्या देत आहेत. 

लहान वयात  मुलं जे ऐकतात ते आयुष्यभर मनात ठेवतात व लहानपणी ऐकलेली गोष्ट चुकीची असली तरी बदलू शकत नाही. त्या प्रमाणेच त्याच वेळी त्यांना योग्य आणि खरे  शिक्षण देण्याची जबाबदारी आहे. किडस् कौशल्य योग्य शब्द संबंधित माहिती आवश्यक संदर्भ एक खास मालिका… या मालिकेत चित्रांसह बिनचूक माहिती मुलांना हसतखेळत  दिलेली आहे. लहान मुलं, आई-बाबा यांच्या कानावर दैनंदिन जीवनात लागणारे सर्व शब्द खऱ्याखुऱ्या मराठमोळ्या स्वरूपात कानी पडावेत, नजरेखालून जावेत जेणेकरून उच्चार व लेखन दोन्ही जसं हवं तसंच व्हावं. यात विविध विषयांवर भाष्य केलं गेलंय व नवीन विषयांवर अजून येतच राहणार आहे… कृपया हे सर्व व्हिडिओ आपणही बघा, मुलांनाही दाखवा आणि  इतरांनाही सुचवा असे आवाहन करण्यात आले. आहे.  चित्रे रंगवून झाल्यावर त्याचा स्क्रीनशाॅट काढून लेवा पाटीदार कम्युनिटी फेसबुक गृपवर अपलोड करण्यात आलीत.. तिथे जवळपास एक लाख सदस्यांना या चित्रकलेचा आनंद घेता आला.

सदस्यांच्या आवडीनुसार प्रत्येक गटात काही विजेते निवडले गेलेत. बाकी विजेते हे परिक्षक राज्य पुरस्कार विजेते श्री लीलाधर कोल्हे सर यांच्या परिक्षणानुसार निवडले गेलेत.. यात कल्पकतेतून रंगनिर्मिती यावर भर दिला गेला.

 

विजेत्यांना ई सर्टिफिकेट व भेटवस्तू 

१२ वर्षांवरील गटातील विजेत्यांना ई सर्टिफिकेट सोबत मराठी पुस्तके भेट म्हणून दिली गेलीत.  यामध्ये आयोजकांना लेवा पाटीदार कम्युनिटी फेसबुक गृप चे संस्थापक व ॲडमिन संजय कोल्हे व ॲडमिन नरेंद्र महाजन यांचे सहकार्य लाभले.

 

Protected Content