युक्रेनमधील युध्दात अडकले बुलढाणा जिल्ह्यातील पाच विद्यार्थी

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | युद्धग्रस्त युक्रेनमध्ये भारतील नागरिकांसह महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील पाच विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळाली आहे.

सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक रशियाने युद्ध पुकारत त्या देशावर हल्ले चढविले आहेत. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये भारतील नागरिकांसह महाराष्ट्रातील मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थीही त्याठिकाणी अडकल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांनी केंद्र – राज्य शासन अन् प्रशासनाकडे मदतीसाठी याचना केली आहे. तर आज 5 नागरिक युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या भारतीय आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.यात विदर्भासह बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर आज दुपारपर्यंत अडकून पडलेल्या 5 भावी डॉक्टराचा शोध लागला आहे. यात देऊळगाव राजा तालुक्यातील मंडल जयेश कालिपाडो, मलकापूर तालुक्यातील माकनेर येथील अवंतिका शेषराव खरसने, देऊळगाव राजा येथील नित्कर्ष चंद्रकांत सानप (विनायटसिया नॅशनल मेडिकल विद्यापीठ), शेगाव मधील माटरगावमधील शगुफ्ता यास्मिन मोहंमद हनिफ (डोनेतस्क नॅशनल मेडिकल), मलकापूर मधील प्रियेश उमाकांत गावंडे (चार्मी विद्यापीठ) यांचा समावेश आहे. या संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासन ते केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. मलकापूर तालुक्यातील माकनेर येथील अवंतिका शेषराव खरसने (२१) युक्रेनमध्ये नॅशनल पिर्गोव मेमोरियल विनीतया येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा व जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष क्रमांक :-07262242400 जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 07262242683/ मो.क्र – 7020435954 तसेच केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय हेल्पलाईन नंबर 1800118797 (टोल फ्री)

011-23012113, 011-23014104, 011-23017905 या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे.

 

 

 

Protected Content