यावल प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्यात खबरदारीचा उपाय म्हणुन सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. या काळात शासनाचे नियम धाब्यावर ठेवून बेशिस्त फिरणाऱ्यांवर २१ जणांवर यावल पोलीसांनी कारवाई केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा जाहिर केला आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांनी आता कारवाईचा धडाका लावला आहे. यात बेशिस्त पध्दतीने वागणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केले आहे. आत्तापर्यंत ४०० हून अधिक जणांवर कारवाई केलीय. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये नागरीकांनी अत्यावश्क कामाशिवाय घराबाहेर फिरू नये, सार्वजनिक ठीकाणी तोंडाला मास्क, रूमाल लावुनच फिरावे, सोशल डिस्टन्स ठेवुनच बोलावे, अशा विविध अटीशर्तींचा नियमात समावेश केला, या कायदाला न जुमानता अनेक नागरीक बेशिस्त वागणुक देत असल्याने अशा नागरीकांच्या विरूद्ध यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी सुमारे चारशेच्यावर नागरिकांवर विविध प्रकारच्या बेशिस्तीचे गुन्हे दाखल करून आजपर्यंत जवळपास ३ लाख रुपयांचे दंडात्मक कारवाई द्वारे वसुल केले आहे दरम्यान आज पाचव्या लॉक डाऊन चा पहीलाच दिवस असुन पोलीस निरीक्षकांनी तोंडाला मास्क अथवा रुमाल न लावता फिरणाऱ्या २१जणांवर दहा हजार पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई व्दारे दंडवसुल केला आहे.